आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबोस्टन- बोस्टन मॅरेथॉन बॉम्बस्फोटातील आरोपींचा शोध घेता घेता अमेरिकी सुरक्षा यंत्रणांची चांगलीच गाळण उडाली असून हा स्फोट घडवून आणल्याचा संशय असलेल्या दोन आरोपींपैकी एका संशयिताला शुक्रवारी ठार मारण्यात आले असून दुस-या सशस्त्र संशयिताला रात्री उशीरा अटक करण्यात आली. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची चौकशी करुन या बॉम्बस्फोटांमागे असलेली कारणे शोधून काढू, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले.
दोन संशयितांचा पाठलाग करत असताना मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीजवळ (एमआयटी) त्यांच्यात आणि पोलिसांमध्ये बोस्टनच्या उपनगरात शुक्रवारी पहाटे तुंबळ धुमश्चक्री झाली. या धुमश्चक्रीत एका संशयिताला ठार मारण्यात आले, तर एमआयटी कॅम्पस पोलिसांचा एक अधिकारीही कामी आला. त्यानंतर पोलिसांनी दुस-या संशयिताचा कसून शोध सुरू केला.
परिवहन सेवा निलंबित, नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना : दुस-या खतरनाक संशयिताचा शोध सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल डेयालल पॅट्रिक यांनी बोस्टनमधील एमबीटीए प्रणाली अंतर्गतच्या सर्व परिवहन सेवा निलंबित केल्या आहेत.
अगोदर भारतीय संशयित
एफबीआयने आपल्या तपासात अगोदर भारतीय विद्यार्थी सुनील त्रिपाठीला संशयित मानले होते. गुरुवारी रात्री त्याला संशयित नंबर 2 असे म्हटले गेले होते. शुक्रवारी सुनील (22) वरून संशयाची सुई बाजूला झाली. संशयित इतर दोन आहेत. ट्विटर व फेसबुकवर सुनीलला संशयित मानणे आणि न मानणे यावरून जणू स्पर्धाच लागली होती. अनेक जणांनी त्याला गुन्हेगार संबोधल्याबद्दल माफी मागितली. सुनील ब्राऊन विद्यापीठातील तत्त्वज्ञान विषयाचा विद्यार्थी आहे. तो 16 मार्चपासून बेपत्ता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.