आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनवर जनसंख्यिकीय संकट, एक अपत्य धोरणामुळे पाच शाळा बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीन मधील तीन दशकांपासून चालत आलेल्या एक अपत्य धोरणाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. मागील चार वर्षांपासून चीनमधील पाच महत्त्वाच्या शाळा बंद झाल्या आहेत. आपल्या धोरणाचा अभिमान असलेल्या चीनवर आता जनसांख्यिकीय संकट ओढवले आहे. या संकटाने गंभीर रूप धारण करू नये, यासाठी मागील वर्षात चीनने या धोरणात शिथिलता आणली आहे. चीनमधील शिक्षण विभागातील अधिकारी म्हणाले की, पूर्व चीनमधील जिअँग्सू प्रांतातील रुडॉँग काउंटीतील पाच शाळा मागील चार वर्षांत बंद झाल्या. प्रशासनाच्या धोरणाचा हा अत्यंत वाईट परिणाम आहे. शाळांमध्ये पुरेसे विद्यार्थी नाहीत.