आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकच चित्रपट 40 वर्षे पुन्‍हा पुन्हा बनवला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकअमेरिकन चित्रपट निर्माते मेल्टन बारकर यांनी 1930 ते 1970 दरम्यान ‘द किडनॅपर्स फॉइल’ नावाचा लघुपट अनेक वेळा बनवला. या चार दशकांच्या काळात ते अनेक छोट्या गावांमध्ये फिरले. गावात जाऊन घोषणा करत असत की, ते एक चित्रपट करत आहे. चित्रपटात अनेक लहान मुलांसाठी काम आहे. ज्या आई-वडिलांना आपल्या मुलांना चित्रपटात पाहण्याची इच्छा असते, त्या पालकांना ते आवाहन करत असत. चित्रपटनिर्मितीसाठी ते स्थानिक लोकांकडून पैसा गोळा करत असत. चित्रपट झाल्यानंतर ते गाव सोडून दुस-या गावाला निघून जात.

अमेरिकन लोकांचे आयुष्य जवळून पाहण्याचा छंद त्यांना होता. मेल्टन यांनी या चित्रपटाच्या शेकडो आवृत्त्या तयार केल्या असतील, असा अंदाज आहे. मात्र, सध्या तरी या चित्रपटाच्या फक्त 20 आवृत्त्या डिजिटाइज करण्यात आल्या आहेत. मेल्टन एखाद्या गावात जाऊन चित्रपट तयार करण्यापूर्वी स्थानिक चित्रपटगृहाशी करार करत असत. चित्रपट तयार केल्यानंतर तेथे त्याचे प्रदर्शन केले जाई. मुलांच्या पालकांना चित्रपट दाखवत असत. त्यानंतर या चित्रपटाची चित्रफित ते थिएटरला देत असत.
boingboing.net