आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फेसबुक'वर एक जीबीपर्यंतची फाईल शेअर करणे शक्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ‘पाइप’ या नव्या अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून आता इंटरनेटवर एक जीबीपर्यंतची फाइल शेअर करणे सहज शक्य होणार आहे. फेसबुकच्या अ‍ॅप सेंटरमधून या सुविधेशी कनेक्ट होता येईल. मोठ्या फाइल्स शेअर करण्यासाठी गुगल ड्राइव्ह आणि ड्रॉप बॉक्ससारखे पर्याय आहेत, पण ही सुविधा सोशल नेटवर्किंग साइटवर मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. जर्मनीची राजधानी बर्लिन येथील ‘पाइप ड्रीम टेक्नोलॉजी’ या कंपनीने हे अ‍ॅप्लिकेशन विकसित केले आहे. ‘ड्रॅग अँड ड्रॉप’ करून तुम्ही कोणतीही फाइल मित्राला पाठवू शकता. या आॅप्शनचा अनेकांना फायदा होणार असला तरी, सध्या मात्र हे अ‍ॅप्लिकेशन फक्त डेस्कटॉप कॉम्प्युटरवरच काम करणार आहे.