आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंट - सुसाट वेगाने जाणा-या कार, मालवाहतूक करणा-या इतर वाहनांत गुरुवारी विचित्र अपघात झाला. ए 249 शिपी क्रॉसिंग पुलावरील ही घटना. सुमारे 100 कार परस्परांवर धडकल्या. त्यात अनेक गाड्यांचे नुकसान झाले. डझनावर नागरिक जखमी झाले आहेत. काहींना त्यात गंभीर जखमाही झाल्या आहेत. अग्निशमन दलाने घटनास्थळी तत्काळ धाव घेतल्यामुळे मृत्यूच्या दाढेतील पाच जणांचे प्राण वाचवता येऊ शकले. अनेक नागरिक सायंकाळपर्यंत कारमध्ये अडकून पडले होते. अपघातानंतर पोलिसांनी हा पूल दिवसभरासाठी बंद केला.
दाट धुके की अन्य काही?
वाहनचालकांसाठी सगळ्यात मोठा वाहतुकीचा होता. परंतु त्याहूनही धोकादायक ठरले ते धुके. या भागात दाट धुके पसरल्यामुळे चालकांना काही अंतरावरीलदेखील दिसनासे झाले होते. गाड्या वेगाने पुलावर आल्या. परंतु धुक्यामुळे काही निर्णय घेण्याच्या आतच त्या परस्परांवर धडकत गेल्या. पुलावर काही अंतरावरीलदेखील दिसेनासे झाले होते. गाड्या केवळ एकमेकांवर आदळल्याच नाहीत तर अनेक कारची तर एकमेकींवर चढण लागल्याचे दिसून आले. दुसरीकडे मात्र या अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही, असे पोलिसांनी सांगितले. त्यामागे केवळ धुके हे कारण असू शकत नाही, असे त्यांना वाटते.
कार हवेत
कारवर कार चढल्यानंतर गाडीमधील व्यक्तीला क्षणभर कळालेच नाही. परंतु जेव्हा कारच्या खिडकीतून बाहेर पाहिले तेव्हा त्यांना आपली कार चांगलीच हवेत असल्याची जाणीव झाली. एखाद्या उंच इमारतीप्रमाणे कारच्या इमारतीचे मजले इथे पाहायला मिळाले. असा अनुभव एका कारचालकाने सांगितला.
10 मिनिटांत कारवर कार आदळल्या.
30 ते 60 फुटांवरीलदेखील धुक्यामुळे दिसत नव्हते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.