आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - E=mc2 (इ बरोबर एमसी स्क्वेअर) हे सूत्र उच्चारल्याबरोबर प्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइनचे नाव समोर येते, परंतु हे आतापर्यंत वाटत आले असले या सूत्रामागे केवळ एकच नव्हे तर दोन मेंदू आहेत, असा दावा अमेरिकी शास्त्रज्ञांनी केला आहे.
हार्वर्ड कॉलेज (पेनसिल्वानिया) येथील एच. स्टीफन बॉन आणि न्यूजर्सीच्या प्रिन्स्टन विद्यापीठातील टोनी रॉथमन यांनी केलेल्या संशोधनातून हा दावा करण्यात आला आहे. ऊर्जेची पद्धतशीर मांडणी करणा-या सूत्राच्या रचनेत खारीचा वाटा ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ फ्रेड्रिक हॅसनोहर्ल यांचाही राहिला असावा, असे संशोधकांचे म्हणणे आहे. हे समीकरण 1905 मध्ये अचानक अवतीर्ण झाले नाही. हॅसनोहर्ल यांनी ऊर्जा आणि मॅटर यांच्यातील संबंध दाखवण्यात यश मिळवले होते, परंतु त्यांनी चुकीचे सूत्र दिले होते. हॅसनोहर्ल यांनी -E = (3/8) mc2 असे सूत्र दिले होते. एवढेच नाहीतर हे सूत्र आइन्स्टाइनच्या नावावर असले तरी त्यामागे केवळ हॅसनोहर्ल आणि आणखीही काही भौतिकशास्त्रज्ञ असावेत, असा अंदाज अमेरिकी शास्त्रज्ञांनी लावला आहे.
इतर शास्त्रज्ञांचेही योगदान
चुंबकीय ऊर्जेविषयीच्या क्षेत्रात हॅसनोहर्ल यांच्याशिवाय फ्रेंच गणितज्ज्ञ हेन्री पॉइनकेअर, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ मॅक्स अब्राहम यांचेही मोठे योगदान आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.