13 वर्षांपूर्वी 11 सप्टेंबर 2001 साली न्यूयॉर्कमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निशाणा बनलेली वर्ल्ड ट्रेड सेंटर बिल्डींग पुन्हा एकदा कामकाजासाठी खुली करण्यात आली आहे. या नव्या इमारतीचे नाव '1 वर्ल्ड ट्रेड सेंटर' असे आहे.
या 104 मजली इमारतीला व्यापार जगतासाठी खुले करण्यात आले आहे. पब्लिशिंग कंपनी कॉन्डे नास्टचे कर्मचारी या इमारतीमध्ये काम करण्यास सुरुवात करत आहेत. कंपनीतील जवळपास 170 कर्मचारी या आठवड्यात काम करण्यास सुरुवात करतील.
या गगनचुंबी इमारतीला पुन्हा एकदा उभे करण्यासाठी 8 वर्ष लागले आणि आता ही अमेरिकेतील सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीचा 60 टक्के भाग भाड्याने देण्यात आला असून सरकारने 2,75,000 स्क्वेअर फुट जागा घेण्याचा करार केला आहे.
पुनर्निर्मित जागेचे मालक पॉर्ट अथॉरिटीचे कार्यकारी निर्देशक पॅटरिक फोरे यांनी सांगितले की, "न्यूयॉर्क शहरातील गगनचुंबी इमारत पुन्हा एकदा उभी राहिली आहे."
541 मीटर उंच आकशाला भिडणारी ही इमारत जुन्या इमारतीच्या मध्ये बांधण्यात आली आहे. या इमारतीमध्ये जुन्या इमारतीच्या आठवणींचे स्मारक आणि संग्रहालयासाठीही जागा देण्यात आली आहे.
पुढील स्लाईड्स्वर क्लिक करा आणि पाहा नवीन वर्ल्ड ट्रेड सेंटरचे फोटो....