आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Year Old Baby Fell From A Second Storey Window In China

दुस-या मजल्यावरू पडलेल्या मुलाला अलगद झेलून वाचवले प्राण...पाहा व्हिडीओ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जांगशान - चीनच्या गुआनडोंग प्रांतातील जांगशान शहरात झालेल्या या घटनेने लोक अक्षरशः स्तब्ध झाले. घराच्या दुस-या मजल्यावरून एक एका वर्षाचा मुलगा खिडकीत खेळत असताना खाली पडला. पण रसत्यावरून जाणा-या ली नावाच्या एका व्यक्तीने त्याला अलगद झेलून त्याचे प्राण वाचवले.
(व्हिडीओ पहा शेवटच्या स्लाईडवर)
सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये कैद झालेल्या या व्हिडीओमध्ये हा मुलगा त्याच्या आईला पाहण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते आहे. यादरम्यान हा मुलगा खिडकीजवळ आला व खाली पडणार तेवढ्यात खाली असणा-या ली आणि त्यांच्या मित्रांनी त्याला पाहिले, व त्याला झेलण्यासाठी ते पळाले.
जोरदार पाऊस सुरू असतानाही लीने मुलाचे प्राण वाचवण्यासाठी चांगलेच परिश्रम घेतले व मुलाला खाली पडण्याआधीच झेलले. या घटनेच्या वेळी विचार करत बसायला फार वेळ नव्हता. त्यामुळे लगेचच निर्णय घेऊन त्याला वाचवले. मुलगा खाली पडला तर त्याचे प्राण जातील याची भीती मनात होतीच, असे ली म्हणाला.
पुढील स्लाईड्सवर पहा घटनेचे काही फोटोज...