आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Petition Against Animal Hunts In African Safaris, Divya Marathi

प्राण्‍यांच्या या छायाचित्रांमुळे पेटले वादळ, FACEBOOK PAGE हटवण्‍याची होतेय मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
( सिंहाबरोबर कँडल) - Divya Marathi
( सिंहाबरोबर कँडल)
इंटरनॅशनल डेस्क - तुम्हाला येथे दिसत असलेले छायाचित्र सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर टाकण्‍यात आले आहे. त्यास पर्यावरणप्रेमींनी विरोध केला आहे. आफ्रिकेतील जंगलात दुर्मिळ प्राण्‍यांच्या शिकारीवरून टेक्सासची 19 वर्षीय कँडल जोन्सला टीकांना सामोरे जावे लागत आहे. या प्राण्‍यांचा शिकार केला आहे , असा दावा करणारे छायाचित्रे कँडलने फेसबुकवर अपलोड केले होते. टीकाकारांच्या म्हणण्‍यानुसार, कँडल आपल्या फेसबुकच्या साहाय्याने प्राण्‍यांच्या शिकारीला वाव देत आहे. अशा प्रकारचे छायाचित्रे सोशल म‍ीडियावर पोस्‍ट करण्‍यास बंदी घातली पाह‍िजे, अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
कँडलने आपल्या फेसबुक पेजवरून शिकार केलेल्या प्राण्‍यांची छायाचित्रे हटवावीत, यासाठी एका ऑनलाइन याच‍िकेद्वारे तिच्यावर दबाव आणण्‍याचा प्रयत्न चालू आहे. आतापर्यंत ऑनलाइन याचिकेच्या समर्थनसाठी 40 हजारांपेक्षा जास्त लोकांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. कँडलच्या या कृत्यामुळे प्राण्‍यांवरील अत्याचाराला वाव मिळेल, असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.

पुढील स्लाइडवर वाचा कँडलने शिकारीबाबत काय म्हटले...