आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाईन खरेदीत मिळाली हिटलची मर्सिडिज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू जर्सी- सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात घरबसल्या ऑनलाइन खरेदी करणार्‍यांची संख्या वाढत आहे. अशीच ऑललाइन खरेदी करताना न्यू जर्सी येथील एकाला चक्क हिटलरची कार मिळाल्याने आश्चर्याचा धक्का बसला.
ऑनलाइन खरेदी करताना जेनोप टुन्सर यांना एक मर्सिडिज गाडी आवडली आणि ती त्यांनी खरेदी केली. गाडी जुनी असल्याने काही पार्टस् बदलण्यासाठी त्यांनी मर्सिडिजच्या शोरूममध्ये फोन केला आणि पाहिजे असलेल्या पार्टसची नोंद केली.
गाडीचा सिरियल नंबर विचारला असता त्यांना समोरून उत्तर दिले गेले की ही गाडी अडॉल्फ हिटलरची
असल्याचे सांगण्यात आले.
मर्सिडीझ ३२० कॅब्रिओलेट डी कन्व्हर्टिबल हे १९४२ सालचे मॉडेल आहे. सीबीएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी नाझी अधिकार्‍यांसाठीच्या खास ८ गाड्या तयार करण्यात आल्या होत्या, त्यापैकीच एक आहे.