आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only Humour Of Snowden Bolivian President Airoplan Moved To Austria

'स्नोडेनसोबत असल्याच्या अफवेने बोलिव्हियाच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान ऑस्ट्रियाकडे वळवले'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिएन्ना - बोलिव्हियाचे राष्ट्राध्यक्ष इव्हो मोरालेस यांच्या विमानाला बळजबरीच ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नाला उतरावे लागले. या विमानात अमेरिकी बंडखोर एडवर्ड स्नोडेन असल्याची अफवा पसरल्याने फ्रान्ससह चार युरोपियन देशांनी मोरालेस यांच्या विमानाला आपल्या हवाई हद्दीतून प्रवास नाकारला. यामुळे स्नोडेन प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले.

रशियातील ऊर्जा शिखर परिषदेचा समारोप करून मोरालेस मंगळवारी रात्री मायदेशी निघाले होते. स्नोडेनला राजाश्रय देण्याचा बोलिव्हिया सरकारचा विचार सुरू आहे, असे विधान मोरालेस यांनी मॉस्को येथे केले होते. त्यामुळे मॉस्को विमानतळावरून त्यांच्या विमानाने उड्डाण घेताच मोरालेस यांच्यासोबत स्नोडेनही विमानात असल्याची अफवा पसरली. लगोलग फ्रान्स, स्पेन, इटली, पोर्तुगाल या देशांनी मोरालेस यांच्या विमानाला आपल्या अवकाश मार्गातून जाण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे मोरालेस यांचे विमान ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथे बळजबरीनेच वळवावे लागले. बुधवारी सकाळी ते मायदेशी रवाना झाले.