आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेबनॉनमध्‍ये उघड्यावरच युध्‍द संग्रहालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेबनॉनमधील मिल्टा परिसरातील 60 हजार चौरस मीटरचे क्षेत्र पाहिल्यास, येथे नुकतेच एखादे युद्ध घडले असल्याचा भास होतो. 1982 ते 2000 पर्यंत लेबनॉन आणि इस्राइल दरम्यान युद्धाचे केंद असेल्या मिल्टामधील युद्ध परिसराला खुल्या हवेतील संग्रहालयाचे स्वरूप देण्यात आले आहे. युद्धादरम्यान फुटलेले रणगाडे, कोसळलेल्या इमारती, क्षेपणास्त्र, बंदुका त्याच अवस्थेत पडल्या आहेत. त्यांना कुणीही जागेवरून हलवलेले नाही. 2010 मध्ये हे संग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाले. युद्धात मारल्या गेलेल्या हिजबुल्लाह या मुस्लिम संघटनेच्या शहिदांना श्रद्धांजली देण्याचा, या संग्रहालयाचा हेतू आहे. येथे आल्यावर पर्यटकांना एक व्हिडिओ दाखवला जातो. त्यावरून या जागेचे गांभीर्य लक्षात येते.
amazingthings