आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात संसदेबाहेर विरोधकांचे ‘अधिवेशन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानच्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी बुधवारी संसदेच्या बाहेर आपले ‘अधिवेशन’ भरवले होते. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यावरील सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी हा पवित्रा घेतला होता.

वरिष्ठ सभागृहाबाहेर विरोधी गटाच्या लोकप्रतिनिधींनी आंदोलन पुकारले होते. त्यांचे मन वळवण्यासाठी जल राज्यमंत्री चौधरी अबिद शेर अली यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी त्यांच्या विनंतीला जुमानले नाही. लोकप्रतिनिधींनी ‘शेम, शेम, शेम’असे नारे देऊन सरकारने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी केली. आपल्या अधिवेशन काळात आम्ही 10 कलमी अजेंडा तयार केला आहे. त्यावरच चर्चा व्हावी, असे आम्हाला वाटते. अमेरिकेच्या मानवरहित हवाई हल्ल्यात पाकिस्तानच्या अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यावर सरकारने अद्याप काहीही कारवाई केलेली नाही.

सरकार काय म्हणते ?
अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 2 हजार 160 दहशतवादी व 67 नागरिकांचा मृत्यू झाला, असा पाकिस्तानच्या गृह खात्याचा अहवाल सांगतो.

विरोधकांचे काय म्हणणे?
गृह खात्याने आपल्या अहवालात दिलेली आकडेवारी चुकीची आहे. संरक्षण मंत्रालयाने देखील असेच म्हटले आहे. हा अहवाल तत्काळ दुरुस्त करण्यात यावा, असे आदेशही जारी झाले आहेत, असे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संसद सदस्य रझा रब्बानी यांचे म्हणणे आहे.