आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Opposition Turns Violent Inside Nepal Parliament Over New Constitution

संविधानावरून नेपाळच्या संसदेला आखाड्याचे स्वरुप, खुर्च्या फेकाफेकी अन् हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - नेपाळच्या संसदेमध्ये सोमवारी मध्यरात्रीनंतर अशी स्थिती निर्माण झाली होती.
काठमांडू - नेपाळच्या संसदेला सोमवारी मध्यरात्रीनंतर आखाड्याचे स्वरुप प्राप्त झाले. एपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षाच्या खासदारांची एकमेकांबरोबर झटापट तर झालीच पण त्यांनी संसदेतील खुर्च्याही एकमेकांना फेकून मारल्या. त्यात चार सुरक्षा अधिकारी जखमी झाले. संसदेमध्ये ठरलेल्या कालावधीपूर्वी नवे संविधान मंजूर करून अंमलात आणले जाणार होते. त्यामुळे विरोधी पक्षांनी हा गोंधळ घातला.
दरम्यान, या प्रकारानंतर विरोधी पक्षांनी आज नेपाळ बंदचे आव्हान केले आहे. तसेच राजधानी काठमंडूमध्ये या प्रकारानंतर जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. सोमवारी रात्री 2.00 वाजेच्या सुमारास संविधान सभेची बैठक सुरू झाली. विरोधी पक्षांनी सभापती सुभाष नेमवांग यांची प्रश्नावली समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव करण्यास थांबवण्यासाठी गदारोळ सुरू केला. पाहता पाहता संपूर्ण प्रकरण हिंसक बनले. विरोधी खासदारांनी खुर्च्यांची फेकाफेकी केली, टेबल अस्ताव्यस्त फेकले तसेच सभापतींकडे मायक्रोफोनही फेकण्यात आला. या दरम्यान माओवादी पक्षाच्या खासदारांनी सभापतींवर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला. पण मार्शल्सने त्यांच्या भोवती कडे तयार करत त्यांचा बचाव केला. त्यानंतर मार्शल आणि विरोधी खासदारांमध्ये झटापट झाली.
संसदेतील या प्रकारानंतर काही तासांतच माओवाद्यांच्या नेतृत्त्वात देशव्यापी बंद सुरू झाला. संविधान गुरुवारच्या ठरलेल्या कालावधीपूर्वी मंजूर करण्यापासून रोखण्यासाठी हा बंद करण्यात आला आहे. या बंददरम्यान बस, ट्रक जाळण्याचा आणि हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. पोलिसांनी 19 जणांना अटक केली आहे.
पुढे पाहा, या संपूर्ण गदारोळाचे Photo आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा Video