आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Organisation For The Prohibition Of Chemical Weapons Wins Nobel Peace Prize

शांततेचे नोबेल रासायनिक शस्‍त्रांचा प्रसार रोखणा-या \'ओपीसीडब्‍ल्‍यू\'ला जाहीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्‍कार जाहीर झाला आहे. यावेळी कोणत्‍याही व्‍यक्तीला पुरस्‍कार न देता एका संघटनेला नोबेलने सन्‍मानित करण्‍यात आले आहे. रासायनिक शस्‍त्रास्‍त्रांचा प्रसार रोखण्‍यासाठी कार्यरत असलेल्‍या ' ऑर्गनायझेशन फॉर प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्‍स' (ओपीसीडब्‍ल्‍यू) या संघटनेला नोबेल जाहीर करण्‍यात आला आहे.

पाकिस्‍तानची मलाला युसुफझई आणि रशियाचे राष्‍ट्राध्‍यक्ष व्‍लादीमिर पुतिन यांचे नाव आघाडीवर होते. परंतु, नोबेल पुरस्‍कार समितीने यावेळेस कोणत्‍याही व्‍यक्तीची निवड केलेली नाही. ओपीसीडब्‍ल्‍यू या संघटनेची पुरस्‍कारासाठी निवड करण्‍यात आली. ही संघटना रासायनिक शस्‍त्रांचा प्रसार रोखण्‍यासाठी कार्यरत आहे. सीरियातील रासायनिक शस्‍त्रे याच संघटनेच्‍या देखरेखीखाली नष्‍ट करण्‍यात येत आहे.