आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लादेनच्या डॉक्टरला 23 वर्षांची शिक्षा; सीआयएला दिला होता ओसामाचा पत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेशावर- अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनची माहिती अमेरिकेला पुरवणारे डॉक्टर शकील आफ्रिदी यांना दोषी ठरवत 23 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानी लवादाने दिलेल्या निवाड्यात त्यांना याआधी झालेली 33 वर्षांची शिक्षा 10 वर्षांनी कमी करून 23 वर्षे केली. लादेनची माहिती देणारे डॉक्टर शकील आफ्रिदी यांना याआधी फेडरल प्रशासकीय आदिवासी प्रदेश (फाटा) लवादाने 2012 मध्ये 33 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. तसेच 3 लाख 20 हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्याविरोधात आफ्रिदींनी लवादाकडे आव्हान दिले होते.

2 मे 2011 रोजी लादेनवर केलेल्या कारवाईनंतर लगेच आफ्रिदी यांना अटक करण्यात आली होती. आफ्रिदी यांचा
बंदी असलेल्या लष्कर-ए-इस्लाम या संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवून त्यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, लष्कर-ए-तोयबाचे प्रवक्ते म्हणून काम करणार्‍या लादेनच्या जावयाविरुद्ध पुरेसे पुरावे आहेत, असे शनिवारी अमेरिकी कोर्टाने स्पष्ट केले.