आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osama Bin Laden\'s Life On The Run Revealed By Pakistani Inquiry

9/11च्या हल्ल्यानंतर काही दिवसांतच पाकिस्‍तानात पोहोचला होता लादेन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- अमेरिकेत झालेल्या 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अलकायदाचा प्रमुख असलेला ओसामा बिन लादेन काही दिवसांत पाकिस्तानात पोहोचला होता. त्यानंतर त्याचे कुटूंबिय त्याला 2002 मध्ये पेशावरमध्ये भेटले होते, अशी माहिती एबटाबाद चौकशी आयोगाच्या हवाल्याने एका वृत्तपत्राने सोमवारी प्रसिद्ध केली आहे. एबोटाबाद आयोगाचा हा अहवाल आतापर्यंत सार्वजनिक करण्‍यात आलेला नव्हता.

'डॉन'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमे‍रिकेतील 9/11च्या हल्ल्यानंतर मोस्ट वॉंटेड दहशतवादी ओसामा लादेन संपूर्व जगात शोध सुरु होता. मात्र लादेन पाकिस्तानात सुरक्षित होता. सगळ्यात आधी लादेनचा ठावठिकाणा अल कायद्याचा दहशतवादी खालिद बिन-अत्ताश याने अमेरिकन पोलिसांना सांगितला होता. अत्ताश याला यूएसएस कोल तसेच आफ्रिकेच्या अमेरिकन दूतावासावर केलेल्या हल्ल्यासंदर्भात 2002 मध्ये अटक करण्‍यात आले होते. अत्ताश यानेच लादेनचा उजवा हात समजल्या जाणार्‍या अबू अहमद अली कुवेती याला ओळखले होते.