आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ऑस्कर’ शर्यतीतून भारतीय चित्रपट बाद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉस एंजलिस - आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या ऑस्कर चित्रपट पुरस्कारांच्या शर्यतीतून भारतीय चित्रपट बाहेर पडला आहे. परदेशी चित्रपट विभागात अव्वल नऊ चित्रपटांच्या पंक्तीत स्थान मिळवण्यात भारतीय चित्रपट अपयशी ठरला.
अदमिंते मकन अबू ( अ‍ॅडमचा पुत्र अबू) या मल्याळम चित्रपटाची भारताच्या वतीनेऑस्करसाठी निवड झाली होती. ताज्या दमाचा मल्याळी दिग्दर्शक सलीम अहमद याने ‘मकन अबू’चे दिग्दर्शन केले होते. पदार्पणाच्या या चित्रपटात त्याने हज यात्रेला जाण्याची इच्छा असलेल्या एका अत्तर विक्रे त्या वृद्धाची धडपड अत्यंत हदयस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. राष्ट्रीय पातळीवर या चित्रपटाची खूपच प्रशंसा झाली. चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट, अभिनेता, छायाचित्रण व पार्श्वसंगीत असे चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सलीमकुमार व झरीना वहाब यांच्या प्रमुख भूमिका आहेत. समीक्षकांच्या कौतुकासही तो पात्र ठरला होता.
हॉलीवूड चित्रपटांसाठी असलेल्या या पुरस्कारांमध्ये परदेशी विभागात यंदा भारतासह बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, जर्मनी, इराण, इस्रायल, मोरक्को, पोलंड, तैवान आदी देशांचे एकूण 60 चित्रपट या शर्यतीत होते. त्यापैकी नऊ चित्रपटांची दुसºया फेरीसाठी निवड झाली. आता या नऊ चित्रपटांमधून मतदानाद्वारे पाच सर्वोत्तम चित्रपटांची निवड केली जाणार आहे. सर्वोत्तम पाच चित्रपटांची नावे पुढील आठवड्यात 24 जानेवारी रोजीऑस्करच्या वेबसाइटवर
पाहावयास मिळतील.ऑस्कर पुरस्कार वितरणाचा भव्यदिव्य सोहळा रविवार, 26 फ्रेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. हॉलीवूडमधील कोडॅक थिएटर आणि हायलँड सेंटरमध्ये हा सोहळा होणार आहे.

03 भारतीय चित्रपट आजतागायत ऑस्करच्या पहिल्या 5 परदेशी चित्रपटात स्थान मिळवू शकले. त्यात आशुतोष गोवारीकर-आमिरचा लगान, अनिवासी भारतीय मीरा नायरचा सलाम बॉम्बे आणि ज्येष्ठ अभिनेत्री नर्गिसच्या ‘मदर इंडिया’चा समावेश आहे.