आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्कर पिस्टोरियसची सुनावणी लांबणीवर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रिटोरिया- ब्लेड रनर म्हणून प्रसिद्ध असलेला धावपटू ऑस्कर पिस्टोरियस याने प्रेयसीची गोळीबार करून केलेल्या हत्येच्या खटल्याची सुनावणी दक्षिण आफ्रिकेतील न्यायालयाने ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे.

ऑलिम्पिक विजेता पिस्टोरियसने व्हेलेंटाइन डे च्या दिवशी घरात चोर शिरल्याचा बहाणा करून प्रेयसीवर गोळीबार केला होता. त्यात तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. पुढील सुनावणीपर्यंत तो कारागृहाबाहेर जामिनावरच राहणार आहे. मंगळवारी सुनावणीच्या वेळी बचावपक्षाच्या वकिलांनी ऑस्करच्या चौकशीसाठी आणखी काही वेळ द्यावा, अशी मागणी केल्यानंतर सुनावणी पुढे ढकलण्यात आली. पिस्टोरियसने आपण मैत्रीण रिव्हा स्टिनकँप हिची चुकून हत्या केल्याचे म्हटले आहे.