आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओटुअम च्या महाराणी करते सेक्रेटरीचे काम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन डीसी - एखाद्या गावाची महाराणी म्हटल्यानंतर त्यांचा जबरदस्त रुबाब असेल, आगेमागे नोकरचाकरांचा लवाजमा असेल, असे तुम्हाला वाटणे स्वाभाविक आहे. परंतु नोकरचाकरांचे जाऊ द्या, महाराणी स्वत:च एका दूतावासात सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत. पण ही त्यांची मुख्य जबाबदारी किंवा काम नाही. वॉशिंग्टन डीसी येथील घाना दूतावासात पेगेलिन बार्टेल्स या सचिव म्हणून नोकरी करत असून त्या बार्टेल्स घानाच्या किना-यावरील ओटुअम या गावच्या महाराणी आहेत.

ओटुअम हे सात हजार लोकवस्तीचे गाव आहे. मासेमारी हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय. 1953 मध्ये घाना येथे जन्मलेल्या बार्टेल्सचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले. त्यानंतर त्या अमेरिकेत आल्या. येथील नागरिकत्व प्राप्त केल्यानंतर घाना दूतावासात काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. 2008 मध्ये अचानक त्यांचे नशीब पालटले. त्यांना एका नातेवाइकाचा फोन आला. त्याने सांगितले की, ओटुअमची महाराणी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. बार्टेल्स यांचा प्रथम या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. परंतु या एका फोनने त्यांचे नशीब पालटले. बार्टेल्सचे काका या गावाचे राजा होते. त्यांच्या मृत्यूनंतर गावक-यानी एकमुखाने त्या पदावर बार्टेल्स यांची निवड केली.

राणी झाल्यावरही नोकरी
बार्टेल्स यांनी दूतावासातील नोकरी सोडलेली नाही. त्या अद्याप तेथे सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत. वर्षातून 11 महिने त्या येथे काम करतात व एक महिना सुटी घेऊन ओटुअमला जाऊन वास्तव्य करतात.
सेक्रेटरी म्हणून काम करत असताना गावात घडणाºया घडामोडींची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवली जाते.