आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधाशासारखे कोकाकोला पिणे बेतले महिलेच्या जीवावर, आठ मुले झाली पोरकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - न्यूझीलंडमधील एक महिलेला कोकाकोलाचे अतिसेवन जिवावर बेतले आहे. ती दिवसाकाठी 10 लिटर कोकाकोला पोटात रिचवत होती. हीच सवय तिच्या मृत्यूला आमंत्रण देणारी ठरली, असा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे.

नताशा हॅरिस या 30 वर्षीय महिलेचा मृत्यू फेब्रुवारी 2010 मध्ये झाला होता. प्रमाणाबाहेर कोकाकोलाचे सेवन केल्याने तिचा मृत्यू ओढवल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. या महिलेच्या मृत्यूमुळे तिची आठ मुले आता पोरकी झाली आहेत. तिने अनेक वर्षे कोकाचे सेवन केले होते. त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर झाला. तिला अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न झाल्या होत्या. अखेर हृदयविषयक गुंतागुंत झाल्याने तिचे जीवन संपले. कोकाने तिची चयापचयाची क्रियाच बिघडवून टाकली होती. त्यातून आजारपण वाढले. नताशा मद्यपान करत नसे; परंतु साखरेच्या अतिरिक्त प्रमाणाने तिचे यकृत निकामी होऊन बसले होते. रक्तातील पोटॅशियमचे प्रमाण कमी झाले होते. आरोग्य बिघडेल, अशा प्रमाणात ड्रिंक केल्यामुळे आलेल्या मृत्यूला आम्ही जबाबदार असू शकत नाहीत, असे कोकाकोला कंपनीने स्पष्ट केले आहे.