आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Over The Kashimir Issur All Islami Countries Support To Pakistan

काश्मीरच्या मुद्यावर इस्लामी देशांचा पाकिस्तानला पाठिंबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - काश्मीरच्या मुद्यावर इस्लामी देशांनी पाकिस्तानाला पाठिंबा जाहीर केला आहे. इस्लामी सहकार्य संघटनेने (ओआयसी) हा पाठिंबा जाहीर केला. इजिप्तची राजधानी कैरो येथे ओआयसीची बैठक सुरू आहे. या बैठकीत पाकिस्तानने काश्मीरचे रडगाणे गायले. भारतानेच सरहद्द ओलांडल्याचा कांगावा करून त्याच्या चौकशीचीही मागणी केली.

भारत-पाकमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेच्या उल्लंघनाची ओआयसी (इस्लामी सहकारी संघटना)कडून चौकशी केली जावी, अशी मागणी पाक विदेशमंत्री हिना रब्बानी खार यांनी केली आहे. मुस्लिम राष्‍ट्रांनी काश्मीर मुद्द्यावर पाठिंबा दिल्याबद्दल खार यांनी त्यांचे आभार मानले. कैरोमध्ये आयोजित ओआयसी ‘काँटॅक्ट ग्रुप ऑन काश्मीर’च्या बैठकीत खार म्हणाल्या, प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरील युद्धबंदीच्या उल्लंघनाची ओआयसीच्या सत्यशोधन समितीकडून चौकशी केली जावी. संयुक्त राष्‍ट्राच्या देखरेख पथकाच्या चौकशीला पाकिस्तानचा पाठिंबा आहे. पाकिस्तानने संयुक्त राष्‍ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर भारताने त्याला जोरदार विरोध केला होता.

ओआयसीचा पाठिंबा
इस्लामी देशांची संघटना ओआयसीचे सरचिटणीस एकमेलेद्दीन इहसानोग्लू यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला. काश्मीर काँटॅक्ट ग्रुपने आगामी बैठक अझरबैजानमध्ये बोलावली आहे.
सदस्य देश
ओआयसी सदस्य देशांमध्ये पाकिस्तान, बांगलादेश, इजिप्त, इराण, अफगाणिस्तान, जॉर्डन, सौदी अरेबिया, तुर्कस्थान, लेबनॉन, मालदीवसह 57 देश आहेत.