आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Owaland Take Separation From Velari, Affair With Actress

ओलांद यांच्याशी काडीमोड घेण्याचा व्हेलरी यांचा निर्णय,अभिनेत्रीसोबत अनैतिक संबंधाची चर्चा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रान्सच्या प्रथम महिला नागरिक व्हेलरी टिअरवेलर रविवारी आपले जोडीदार राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांना घटस्फोट देण्यासंबंधीची घोषणा करू शकतात. अभिनेत्रीसोबतच्या अफेअरच्या चर्चेनंतर दोघांच्या आयुष्यात वादळ निर्माण झाले. रविवारपासून व्हेलरी भारतभेटीवर येणार आहेत.
व्हेलरी आणि ओलांद 2006 पासून पार्टनर आहेत. ओलांद यांच्या अगोदर व्हेलरी यांचे दोन जणांशी विवाह आणि घटस्फोट झाले होते. त्या एका धर्मार्थ कार्यक्रमासाठी भारत दौ-यावर येत आहेत. कथित प्रेमसंबंधाचे प्रकरण संपुष्टात येईपर्यंत व्हेलरी यांनी कुठेही जाऊ नये, अशी ओलांद यांची इच्छा आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष भवन अ‍ॅलिसी पॅलेसमधून यासंबंधी एखादी सूचना जारी होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्याने यासंबंधी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी क्लोजर
नियतकालिकाने ओलांद आणि फ्रेंच अभिनेत्री ज्युली गाएत यांच्यातील कथित संबंधांचा गौप्यस्फोट केला होता. व्हेलरी-ओलांद यांचा विवाह झालेला नाही; परंतु ओलांद राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून त्या देशाच्या प्रथम महिला बनल्या आहेत. खासगी आयुष्यातील या घटनेने मीडियातील ओलांद यांच्या उद्योगफ्रेंडली घोषणांना दाबून टाकले होते.