आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्सफर्डच्या विद्यार्थिनीने मित्राला शिकवला धडा, वाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शालेय जीवनात काही घटना अशा घडतात की, मुलांच्या मनात कायम घर करून बसतात. यात काही चांगल्या गोष्टी असतात, अन‌् काही वाईटही. या गोष्टींचा त्यांच्या जीवनावर काही ना काही परिणाम जरूर होतो. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी लुईसा मॅनिंग(२२) हिच्यासोबत ती चौदा वर्षाची असताना अशीच एक घटना घडली. तिने सांगितले, मी लठ्ठ असल्याने विद्यार्थ्यांचा एक ग्रुप मला सतत चिडवायचा. या त्रासामुळे तिला ९ वीनंतर शाळा सोडावी लागली. त्यानंतर लुईसाने पुढच्या तीन वर्षात वजन घटवले.
काही दिवसांपूर्वी लुईसाला त्या टोळक्यातील एक मित्र ऑनलाइन भेटला. दोघांमध्ये बोलणे झाले. त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्या मुलाने लुईसाला एका रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी बोलावले. लुईसाला त्याला अद्दल घडवायची होती. ती त्या रेस्टॉरंटमध्ये गेली; परंतु वेटरच्या हाती एक पत्र देऊन परतली. वेटरने ते पत्र त्या विद्यार्थ्यास दिले. लुईसा तेथे न भेटल्याने त्याला आश्चर्य वाटले.

पुढे वाचा लिहिलेले पत्र