आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन- पाकिस्तानने अण्वस्त्रसज्जता वाढविण्याची तयारी सुरु केली आहे. लहान आकाराची आणि हलक्या वजनाची अण्वस्त्रे बनविण्यावर पाकिस्तान भर देत आहे, अशी माहिती एका नियतकालिकाने दिली आहे. छोटी अण्वस्त्रे कोणत्याही क्षेपणास्त्रांवर बसविता येतील, अशी पाकची योजना आहे.
नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून झपाट्याने अण्वस्त्रांची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या दशकात अण्वस्त्रांच्या संख्येत पाकिस्तान ब्रिटनला मागे टाकेल. पाकिस्तानने प्लुटोनियम निर्मितीची क्षमता वाढविण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. प्लोटोनियम तयार करणारे दोन नवीन रियाक्टर्स पाकिस्तानने उभारले आहेत. याशिवाय एक रासायनिक प्रक्रीया केंद्रही पाकिस्तानने उभारले आहे. प्लुटोनियम निर्मिती क्षमता वाढविण्याच्या प्रयत्नावरुन पाकिस्तानचे इरादे स्पष्ट होतात.
भारत आणि पाकिस्तानकडे अंदाजे 100 अण्वस्त्रे असण्याचा अंदाज या नियतकालिकाने केला आहे. तर इस्रायलकडे 200 अण्वस्त्रे असण्याची शक्यता आहे. ब्रिटनकडे अंदाजे 225 अण्वस्त्रे असून पाकिस्तान यापुढेही जाण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.