Home | International | Pakistan | pak, america

सैन्य मागे घेण्याची पाककडून धमकी

वृत्तसंस्था | Update - Jul 13, 2011, 06:02 AM IST

अमेरिकेने लष्करी मदत नाकारल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवरील सैन्य मागे घेऊ, अशी धमकी दिली आहे.

  • pak, america

    इस्लामाबाद: अमेरिकेने लष्करी मदत नाकारल्यानंतर भडकलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तान सीमेवरील सैन्य मागे घेऊ, अशी धमकी दिली आहे. निधी बंद झाल्यामुळे या भागात लष्करी जवान ठेवणे परवडणारे नाही, असे संरक्षणमंत्री अहमद मुख्तार चौधरी यांनी म्हटले आहे.
    ओबामा प्रशासनाकडून ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत बंद झाल्याने पाकिस्तानला पोटशूळ उठला आहे. त्यामुळेच अफगाणिस्तान सीमेवरील सुमारे १ हजार १०० जवान परत बोलावण्याची भाषा पाकिस्तानने केली असल्याचे सांगण्यात येते. हा सीमा भाग आदिवासीबहुल आहे. या भागात सुरक्षा व्यवस्था पुरेशा प्रमाणात आहे, हे दाखवण्यासाठी पाकिस्तानने हे जवान त्या भागात तैनात केले होते.
    अमेरिकेकडून मिळणाºया निधीतील ३०० दशलक्ष डॉलर्स एवढी रक्कम या भागातील लष्करी जवानांवर खर्च होत होती, असे संरक्षणमंत्री चौधरी यांनी स्पष्ट केले.

Trending