आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतविरोधी कारवायांसाठी पाकमध्ये निधी संकलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- काश्मीरमध्ये भारताच्या विरोधात आणि अफगाणिस्तानात अमेरिकन नाटो सैन्याच्या विरोधात जिहाद पुकारणारे दहशतवादी पाकिस्तानातील शहरांत व मोहल्ल्यांमध्ये उघडपणे दहशतवाद्यांची भरती व चंदा गोळा करत आहेत. हिजबुल मुजाहिदीनपासून वेगळा झालेला गट अल बद्र मुजाहिदीनने रावळपिंडीतील स्वान अड्डा भागात गेल्या आठवड्यात त्यासाठी एक अतिरेकी संमेलन घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे.
एका दैनिकाने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे. त्यात म्हटले आहे की, रविारी पार पडलेल्या या संमेलनात क हजार दहशतवादी सहभागी झाले होते. अल बद्र मुजाहिद्दीनचा प्रमुख बख्त जामीन खान याने या संमेलनात सांगितले की अफगाणिस्तानात अमेरिकेच्या विरोधात तसेच काश्मीरमध्ये सुरू असलेला जिहाद सुरू ठेवण्यासाठी त्याचे ममांडर निधी संकलन करत आहेत. खान व त्याचे कमांडर काश्मीर व अफगाणिस्तानात मोठा घातपाती हल्ला करू इच्छितात. पण त्यासाठी शस्त्रास्त्र, साहित्याची आवश्यकता असून त्याची जुळवाजुळव करण्यात येईल. आम्ही हिंमत हरणार नाही.
सलाउद्दीनचे विखारी भाषण : या संमेलनात हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीन याने भारत व अमेरिकेच्या विरोधात अत्यंत विखारी भाषण केले. आम्ही काश्मीरमध्ये लढत आहोत. आम्हाला दहशतवादी म्हटले जात आहे, याबद्दल आमच्या मनात जराही खेद नाही. उलट त्याबाबात आम्हाला गर्वच आहे. अफगाणिस्तानात अमेरिका व त्यांच्या सहकारी देशांसोबत लढल्याने आम्हाला दहशतवादी म्हटले जात आहे. पण अमेरिका व नाटो देशांनी पाकिस्तानची घेराबंदी केली आहे. अमेरिका व इस्त्राइलने कारस्थान करून पाकिस्तानला टार्गेट बनवले आहे. पाकिस्तानातील भौगोलिक सीमा, सुरक्षा व इस्लामची ओळख धोक्यात पडली असून आम्हाला त्यापासून देशाचे संरक्षण करायचे आहे.