आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाककडून अण्वस्त्राची जमवाजमव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वॉशिंग्टन - पाकिस्तान अण्वस्रांची संख्या झपाट्याने वाढवत आहे. आता छोट्या आणि वजनाने हलक्या अण्वस्रांची निर्मिती करण्यावर भर देत आहे. क्षेपणास्रांनाही जोडता येतील, अशी अस्रे निर्मिती करीत आहे.‘बुलेटिन ऑफ द अ‍ॅटोमिक सायंटिस्ट’जर्नलच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. येत्या दशकात अण्वस्रांच्या संख्येत पाकिस्तान ब्रिटनलाही मागे टाकेल अशी स्थिती सध्या आहे असे या बुलेटिनमध्ये म्हटले आहे. अण्वस्रांची संख्या वाढवण्याचे स्पष्ट संकेतही पाकिस्तानने दिले असून प्लुटोनियम निर्मितीची क्षमताही वाढवली आहे. भारत आयएनएस अरिहंतसोबत पाणबुडीमध्ये अण्वस्रवाहू 15 क्षेपणास्रे लावणार असल्याचेही या जर्नलमध्ये म्हटले आहे.

19000 अण्वस्रे जगभरात
420 अण्वस्र संपन्न देशांकडे
225 अण्वस्रे ब्रिटनजवळ
10,680 भारत, पाकिस्तान, इस्रायलसारख्या देशांकडे
200 इस्रायल
100 भारत
100 पाकिस्तान