आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Court Grants Bail To 26 11 Accused Zakhir Ur Rehman Lakhvi

\'मुंबई 26/11\'चा आरोपी आणि LETचा कमांडर रहमान लखवीला पाकिस्तानच्या कोर्टाने दिला जामीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावळपिंडी- पाकिस्तानने दहशवादाविरोधात खंबीरपणे लढा देण्याची तयारी केली आहे. मात्र, दुसरीकडे लष्कर-ए-तैयबाचे क्रुरकर्मा दहशतवादी आणि मुंबईतील 26/11 हल्ल्यातील आरोपी जकीउर रहमान लखवी याला पाकिस्तानातील दहशतवादविरोधी कोर्टाने गुरूवारी जामीन मंजूर केला आहे. कोर्टाने लखवीसह सात आरोपींची जामिनावर सुटका केली आहे. सध्या सर्व आरोपी रावळपिंडी येथील अडियाला तरुंगात कैद आहेत.

जकीउर रहमान लखवीवर मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणे आणि हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे. याशिवाय दहशतवादी अजमल कसाब याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पुरवण्याचाही आरोप आहे0.

मुंबई हल्ल्यातील सात आरोपींनी बुधवारी कोर्टाकडे जामीन याचिका सादर केली. मात्र, पेशावरमधील आर्मी स्कूलवर तालिबानींने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आरोपींच्या जामीन याचिकेवर सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे गुरुवारी झालेल्या सुनावणीत जकीउर रहमान लखवी, अब्दुल वाजिद, मजहर इकबाल, हमद आमिन सादीक, शाहीद जमील रियाज, जमील अहमद आणि युनूस अंजुम या सातही आरोपींना जामीन मंजूर करण्‍यात आला आहे.

भारत सरकारने अनेकदा पाकिस्तानकडे लखवीला सोपवण्याची मागणी केली होती. परंतु पाकिस्तान सरकारने भारताची मागणी पूर्ण केली नाही. याउलट लखवीची जामिनावर सुटका केली आहे. यामुळे भारत सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुंबईत झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात 166 निष्पाप लोकांनी प्राण गमावले होते. 11 दहशतवाद्यांपैकी एकमेव जिवंत पकडलेला दहशतवादी अजमल कसाब याला भारत सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. कुख्यात दहशवादी हाफिज सईदप्रमाणे रहमान लखवी यालाही अमेरिकेने दहशतवादी घोषित केले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, तुरूंगात कैद लखवी बनला होता बाप..