आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pak Fires Officer Working For Hindu Muslim Unity

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतात बुट साफ करणा-या अधिका-याना पाकिस्तानने केले निलंबित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - भारतातील गुरुद्वारे आणि मंदिरात कारसेवा करणे पाकिस्तानेचे डिप्टी अ‍ॅटर्नी जनरल खर्शिद खान यांना महाग पडले आहे. पाकिस्तान सरकारने त्यांना निलंबीत केले आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनने खुर्शिद यांना विदेशात पाकिस्तानची बदनामी केल्याच्या आरोपावरुन नोटीस पाठवली होती.
खुर्शिद खान मार्चमध्ये बार असोसिएशनच्या २०० सदस्यांसह भारतात आले होते. यावेळी त्यांनी तालिबान आणि आपल्या पापक्षालनासाठी जामा मस्जिद, अमृतसरचे सुवर्ण मंदिर आणि दिल्लीच्या बिर्ला मंदिरात चप्पल-बुटांची पॉलिश आणि साफ सफाई केली होती. सध्या ते नेपाळ आणि भूतान दौ-यावर आहेत. तिथेही ते अशी 'सेवा' करण्यासाठी गेले आहेत. पेशावर येथे नियुक्ती असलेल्या खान यांना त्यांच्या गैरहजेरीत निलंबित करण्यात आले असून, त्यांच्या जागेवर दुस-या वकीलाची नियुक्ती करण्यात आली आहे. अ‍ॅटर्नी जनरल इरफान कादिर यांनी खुर्शिद यांना पदावरुन हटवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र, कारण स्पष्ट केले नाही.
खुर्शिद दहशतवाद विरोधासाठी आणि हिंदू-मुस्लिम एकतेच्या उद्देशाने वेगवेगळ्या धार्मिक स्थळांवर जाऊन सेवा करतात. दोन वर्षांपूर्वी जेव्हा तालिबानने काही शिखांचे शिरकाण केले होते तेव्हा खुर्शिद यांनी जोगन शाह गुरुद्वा-यात जाऊन सेवा केली होती. तेव्हा त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली होती.
मार्चमध्ये जेव्हा त्यांनी भारतातही हेच काम केले तेव्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी त्यांना नोटीस पाठवली होती. त्यात म्हटले होते की, खान सन्मानपूर्वक पद्धतीनेही आपले काम करु शकतात. तेव्हा खान यांनी, पाकिस्तानला बदनाम कोण करत आहे, हत्यारा अजमल कसाब की ती व्यक्ती जी सेवाम्हणून हिंदू, शिख आणि ख्रिश्चनांच्या मंदिरात चप्पल-बुट साफ करत आहे, असे सवाल उपस्थित केला होता. माझा उद्देश देशाला बदनाम करण्याचा नसून सेवा करण्याचा असल्याचे ते म्हणाले.
बनावट पासपोर्टमध्ये पाकिस्तान नंबर वन
पाकिस्तान: हिंग्लाज माता मंदिराच्या अध्यक्षांचे अपहरण
पाकिस्तान डायरी : विदेशी चिश्ती बेगम आणि रहस्यमय स्वप्न