आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानमध्‍ये सार्वत्रिक निवडणूक जाहीर, 11 मे रोजी होणार मतदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्‍लामाबाद- पाकिस्‍तानमध्‍येही सार्वत्रिक निवडणूक जाहीर करण्‍यात आली आहे. पाकिस्‍तानात 11 मे रोजी मतदान होणार आहे. राष्‍ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून लवकरच जाहीर करण्‍यात येणार आहे.

पाकिस्‍तानच्‍या सरकारने इतिहासात प्रथमच कार्यकाळ पूर्ण केला होता. त्‍यामुळे आगामी निवडणूकही ऐतिहासिक ठरणार आहे. लोकशाही पद्धतीने निवडण्‍यात आलेल्‍या सरकारकडून प्रथमच निवडून गेलेल्‍या सरकारकडे सत्तेचे हस्‍तांतरण होईल.

पाकिस्‍तानच्‍या काळजीवाहून पंतप्रधानांनी राष्‍ट्रपतींकडे प्रस्‍ताव दिल्‍यानंतर लगेचच निवडणुकीची घोषणा करण्‍यात आली. पाकिस्‍तानात आतापर्यंत बहुतांश काळ लष्‍करशहांचीच सत्ता होती. इतिहासात प्रथमच सरकारने 16 मार्च रोजी कार्यकाळ पूर्ण केला होता. त्‍यामुळे कायद्यानुसार 60 दिवसांच्‍या आत मतदान होणे आवश्‍यक आहे. त्‍यानुसार निवडणूक जाहीर करण्‍यात आली आहे.