आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये हिंदू मुलींचे शोषण सुरूच आहे. सिंध प्रांतात आणखी एका हिंदू तरुणीचे अपहरण करून धर्मांतर व त्यानंतर जबरदस्तीने निकाल लावल्यामुळे पाकिस्तानी अल्पसंख्याक समुदायामध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतप्त हिंदू समुदायाने रस्त्यावर उतरून उग्र निदर्शने केली.
या घटनेनंतर जेकोबाबाद हिंदू पंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. जेकोबाबाद येथील जांझगिरी भागातील सराफ अशोककुमार यांची मुलगी गंगा हिचे अपहरण करण्यात आले.अमरोट शरीफ दर्गा येथे धर्मांतर करून तिचे नाव आसिया ठेवण्यात आले. त्यानंतर तिचा सोन्याचा व्यापारी बहादूर अली सुर्हीओचा मुलगा आसिफ अलीशी जबरदस्तीने निकाह लावण्यात आला.
निकाह लावण्यात येत असल्याचे कळताच हिंदू समुदाय मशिदीत गेला; परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. याप्रकरणी आसिफचा पिता बहादूर, त्याचा भाऊ आणि अपहरणात साथ देणार्या मिरान बख्श यांना अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.