आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak India Friendship Bus Stopping At Pakistan , Latest News In Marathi

पाक-भारत ‘दोस्ती’ बसला वाघानंतर ‘नो एंट्री’, गुलबर्ग व नानकाना साहिब स्टेशन बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - नवी दिल्ली ते लाहोरदरम्यान पाक-भारत दोस्ती बसला प्रथमच पाकिस्तानमधील वाघानंतर प्रवेशास मनाई करण्यात आली आहे. ही बससेवा वाघामधील नानकाना साहिब आणि लाहोरमधील गुलबर्ग या दोन स्टेशनसाठी बंद करण्यात आली आहे. वाढत्या दहशतवादी धमक्यांमुळे हे पाऊल उचलले असल्याचे पाक प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
१६ मार्च १९९९ रोजी दोन्ही देशांतील नागरिकांचा संवाद वाढावा, या उद्देशाने ही बस सेवा सुरू झाली होती. पाकिस्तानमधील पर्यटन विकास मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे की, पाकिस्तान-भारत दोस्ती बस सेवा आता केवळ वाघा सीमेपर्यंतच येऊ शकेल. बसचे कार्यालय वाघा येथे हलवण्यात आले आहे. त्यामुळे नवी दिल्ली किंवा अमृतसरसाठी रवाना होणाऱ्या प्रवाशांना आता वाघा येथून बस पकडावी लागेल. याचप्रकारे भारतातून येणाऱ्या प्रवाशांना वाघा स्टेशनलाच उतरावे लागेल. यामळे दोन्ही देशांतील प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.

१६ डिसेंबर रोजी पाकमधील पेशावर येथे तालिबानी अतिरेक्यांनी लष्करी शाळेवर केलेल्या गोळीबारात १५० जणांचा बळी गेला, तेव्हापासून नवाज शरीफ सरकारने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक पाऊले उचलली आहेत. त्याचाच हा एक भाग असल्याचे पाक प्रशासनाचे म्हणणे आहे.