पाकमध्ये नऊ वर्षांत / पाकमध्ये नऊ वर्षांत २८९० नागरिकांचा बळी

वृत्तसंस्था

Jul 14,2011 05:34:19 AM IST

इस्लामाबाद: पाकिस्तानचा वायव्य प्रांत खैबर पख्तुनख्वामध्ये गेल्या नऊ वर्षांमध्ये झालेल्या २०२८ दहशतवादी हल्ल्यांत किमान २ हजार ८९० नागरिक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकाने जारी केलेल्या अहवालामध्ये २००३ पासून झालेल्या हल्ल्यांतील बळींची संख्या देण्यात आली आहे.
मृतांमध्ये सुरक्षा कर्मचारी, लिपिक, पत्रकार, डॉक्टर, अभियंते, खासगी कर्मचारी आदींचा समावेश आहे. हल्ल्यांमध्ये निमलष्करी दलाचे १२० जवान, ४४१ पोलिस कर्मचारी तसेच २९७ लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त ७ हजार ३५ जवान जखमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

X
COMMENT