वली करझार्इंचा दफनविधी, / वली करझार्इंचा दफनविधी, गव्हर्नरवर बॉम्बहल्ला

वृत्तसंस्था

Jul 14,2011 05:30:06 AM IST

कंदहार : अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांचे धाकटे सावत्रबंधू अहमद वली करझाई यांचा आज दफनविधी झाला. हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या दफनविधीवेळी भावाचा मृतदेह पाहताच राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. वली करझाई यांची मंगळवारी त्यांच्या राहत्या घरातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. दरम्यान, या दफनविधीला उपस्थित राहण्यासाठी निघालेल्या हेलमांंदचे गव्हर्नर बाँब हल्ल्यातून बालंबाल बचावले.
वली करझाई यांच्या दफनविधीपूर्वी सरकारी गेस्टहाऊस मंडिगकवर प्रार्थनासभा झाली. त्यानंतर त्यांचा मृतदेह कर्झ या करझार्इंच्या मूळ गावी नेण्यात आला. तिथे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे शिष्टमंडळ पोहोचले. दफनविधीवेळी कंदहार प्रांतात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. जागोजागी अफगाण पोलिस, जवान तैनात करण्यात आले होते. तत्पूर्वी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी राष्ट्राध्यक्ष करझार्इंना फोन करून त्यांचे सांत्वन केले.
दरम्यान, वली करझाई यांच्या दफनविधीस उपस्थित राहण्यासाठी निघालेले हेलमांद प्रांताचे गव्हर्नर गूलाब मंगल आणि अफगाण गुप्तचर विभागाचे प्रमुख यांची मोटार उडवून देण्याचा प्रयत्न झाला. रस्त्यात पेरलेला बाँब अतिरेक्यांनी उडूवन दिला. मात्र या हल्यातून हे दोघेही बालंबाल बचावले. तालिबानचे अतिरेकी रस्त्यावर मिळणाºया स्वस्त बॉँबचाच उपयोग करतात.

X
COMMENT