आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेवर पाकिस्तानची पुन्हा कुरघोडी; ड्रोन हल्ल्यांना विरोध

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेकडून केल्या जाणाऱया ड्रोन हल्ल्यांना पाकिस्तानाने शनिवारी पुन्हा एकदा कडाडून विरोध केला. पाकिस्तान त्यांच्या भूमीवर कोणत्याही स्वरुपाचे ड्रोन हल्ले सध्या खपवून घेणार नाही, असे वृत्त येथील काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.

पाकिस्तानातील वरिष्ठ अधिकाऱयांनी अमेरिकेतील वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानमधील शम्सी किंवा अन्य कोणत्याही विमानतळावरून ड्रोन हल्ल्यांना परवानगी देण्यात येणार नाही, असे म्हटले आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईसाठी सैनिकांना प्रशिक्षण देणाऱया अमेरिकी सैन्यातील प्रशिक्षकांना मात्र एप्रिल-मेपर्यंत पाकिस्तानात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये नाटोने केलेल्या कारवाईत २४ पाकिस्तानी सैनिक मारले गेले होते. त्यानंतर पाकिस्तान आणि अमेरिका या दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. अमेरिकेबरोबर पुढील काळात कसे संबंध ठेवायचे, यावर पाकिस्तानी संसद सध्या विचार करीत आहे. ३० जानेवारीनंतर त्याबद्दल अधिकृतपणे माहिती देण्यात येणार आहे.
अवघा पाकिस्‍तान \'सुखोई\'च्‍या टप्‍प्‍यात
लष्‍कर, आयएसआयवर सरकारचे नियंत्रण नाही- पाकिस्‍तान
...अखेर कधीपर्यंत अमेरिका खोटे बोलत राहणार, पाहा व्हिडिओ