Home | International | Pakistan | pak-media-person-is-elligeble-for-wepon

पाक पत्रकारांना शस्त्र बाळगण्याची परवानगी

Agency | Update - Jun 02, 2011, 02:18 AM IST

पत्रकार सय्यद सलीम शहजाद यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर पाक पत्रकारांना छोटे शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे

  • pak-media-person-is-elligeble-for-wepon

    इस्लामाबाद । पत्रकार सय्यद सलीम शहजाद यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर पाक पत्रकारांना छोटे शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री रेहमान मलिक यांनी बुधवारी दिली. शहजाद यांच्या हत्येमध्ये पाक गुप्तचर संस्था 'आयएसआयÓचा हात असल्याच्या शक्यतेचीही चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. शहजाद यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांना बोलत होते. परंतु हे प्रकरण वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचे ते म्हणाले. शहजाद यांचे अपहरण आयएसआयने केल्याचा संशय एचआरडब्ल्यूने व्यक्त केला आहे.

Trending