आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1.43 अब्ज रुपये मालमत्तेसह देशातील खासदारांमध्ये पंतप्रधान नवाझ शरीफ सर्वात श्रीमंत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ 1.43 अब्ज रुपये मालमत्तेसह देशातील खासदारांमध्ये सर्वात श्रीमंत असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. नवनिर्वाचित खासदारांची संपत्ती काही लाखांपासून अब्जावधीच्या घरात आहे. अनेक संसद सदस्यांचे स्वत:चे साखर कारखाने व कापड मिल आहेत. शरीफ यांची जमिनीची किंमत 1.43 अब्ज रुपये आहे. त्यांची 1 कोटी 30 लाख रुपयांची गुंतवणूक असून सहा वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये 12 कोटी 60 लाख रुपयांचे शेअर्स आहेत.