आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak President Asif Ali Zardari And Militory Communication Going On

टेन्शनवर चर्चेचा बाम, राष्ट्राध्यक्ष झरदारींची लष्काराशी बोलणी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान नोटीसीमुळे पाकिस्तानी राजकारणात वादळ उठले असतानाच मेमोगेट प्रकरणी निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी लष्करासोबत चर्चा सुरु केली आहे.
भ्रष्टाचाराचे खटले पुन्हा सुरु करण्यात अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना अवमान नोटीस जारी केली आहे. तसेच गिलनी आणि लष्करप्रमुख अश्फाक कयानी यांच्यातील संघर्षही टोकाला गेला आहे.या पार्श्वभूमीवर झरदारी यांनी सरकार व लष्करातील तणाव कमी करण्यासाठी चर्चेचा बाम लावला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या संयुक्त दलाचे चेअरमन जनरल खालीद शमीम वेन यांनी सोमवारी राष्ट्राध्यक्षकार्यालयात झरदारींची भेट घेतली. गेल्या आठवडयात झरदारी व कयानी यांची चर्चा झाल्यानंतर ही लष्करी अधिकाºयाशी चर्चा करण्याची दुसरी वेळ होती.या चर्चेचा तपशील मिळू शकला नाही.लष्कराशी संबंधित क ाही व्यावसायिक गोष्टींवर चर्चा झाल्याचे एक अत्यंत छोटेखानी निवेदन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने काढले. परंतु या मेमोगेटसह इतर तिढ्यातून मार्ग काढण्यासाठी दोघांमध्ये चर्चा झाली होती.

तर गिलानींना 14 वर्ष शिक्षा
भ्रष्टाचारावर निगराणी ठेवणारी पाकिस्तानी संस्था अकाउंटीबिलीटी ब्युरोही पंतप्रधान गिलानी यांच्याविरुध्द पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी कारवाई सुरु करण्याच्या विचारात आहे.
याप्रकरणी ते दोषी सिध्द झाल्यास गिलानींना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.अदनान ख्वाजा यांना न्यायालयाने दोषी ठरवूनही गिलानी यांनी ख्वाजा यांना आॅईल अँड गॅस कंपनीच्या चेअरमनपदी नियुक्त केले होते.गिलानी यांनी केलेल्या काही नियुक्यांविरुध्द सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्याची ब्युरोचे प्रमुख फसीह बुखारी यांनी गंभीर दखल घेतली असून त्यांच्याविरोधात खटलाही दाखल होऊ शकतो असे वृत्त न्यूज डेली वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान, पाकिस्तानचे प्रख्यात विधीज्ञ बॅरिस्टर ऐतझाज एहसान हे यांच्या वतीने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणार आहेत.