आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ शरीफ आज सूत्रे स्वीकारणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- नवाझ शरीफ बुधवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. एका छोटेखानी समारंभात त्यांच्या कॅबिनेटचा शपथविधी पार पडेल. देशाची सूत्रे हाती घेण्याची त्यांची ही तिसरी वेळ असेल. नॅशनल असेंब्लीच्या 342 सदस्यीय सभागृहात शरीफ यांच्या पीएमएल(एन) पक्षाला 180 जागा मिळाल्या. इतर
सदस्यांच्या सहकार्याने पक्षाने सत्ता स्थापनेत यश मिळवले आहे. शरीफ स्वत: कडे महत्त्वाचे असलेले परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण विभाग ठेवण्याची शक्यता आहे. बुधवारी 20 मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. या अगोदर 1990-93, 1997-99 या काळात पंतप्रधान पदावर होते.