आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी पंतप्रधानांची चौकशी स्थगित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


इस्लामाबाद - भ्रष्टाचार प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांची चौकशी स्थगित करण्यात आली आहे. त्याअगोदर तपास अधिका-याच्या मृत्यूची चौकशी केली जाणार आहे. या अधिका-या ने अशरफ यांची चौकशी केली होती.
वीज योजनेशी संबंधित योजनेतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पंतप्रधान अशरफ यांना अटक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत; परंतु तपास अधिकारी कामरान फैजलच्या मृत्यूची चौकशी पूर्ण होईपर्यंत पंतप्रधानांची चौकशी केली जाणार नसल्याचे नॅबचे अध्यक्ष अ‍ॅडमिरल फसीह बुखारी यांनी सांगितले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. कामरान नॅबचे सहायक संचालक होते. त्यांचा मृतदेह 18 जानेवारीला त्यांच्या घराशेजारी एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता.
दरम्यान, मृत्यूच्या एक दिवस अगोदर कामरान आणि नॅबचे अध्यक्ष फसीह यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी उडाली होती, असे कामरानचे वडील अब्दुल हमीद यांनी सांगितले.