आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Sc Rejects Musharraf S Plea To Shift Bugti Murder Case

बुगाती हत्याकांडप्रकरणी परवेज मुशर्रफ यांना झटका; याचिका फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांना सुप्रीम कोर्टाने झटका दिला आहे. अकबर बुगाती हत्याकांडाची सुनावणी क्वेटा कोर्टातून इस्लामाबाद कोर्टात स्थलांतरीत करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने आज (मंगळवारी) फेटाळून लावली आहे.

सर न्यायाधीश नसीरुल मलिक यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या एका खंडपीठाने हा निकाल दिला. क्वेटा येथे आपल्या जीवाला धोका असल्याचे मुशर्रफ यांनी याचिकेत म्हटले होते. त्यामुळे हे प्रकरण इस्लामाबाद कोर्टात स्थलांतरीत करण्‍याची विनंती याचिका त्यांनी दाखल केली होती.

मुशर्रफ सध्या इस्लामाबादेत नजरकैदेत आहेत. त्यांच्या राहत्या घराबाहेर जवळपास तीनशे पोलिस कर्मचारी, निमलष्करी दलाचे जवान तसेच दहशतवाद नियंत्रक पथकाचे अधिकारी तैनात आहेत.

दरम्यान, मुशर्रफ यांच्या आदेशावरून लष्काराने सुरु केलेल्या अधियानात 26 ऑगस्ट 2006 मध्ये बलूच राष्‍ट्रवादी नेते अकबर बुगाती यांचा मृत्यू झाला होता।