Home | International | Pakistan | pak scientist in indian jail, pak court, international, pakistan

'आपला एक शास्त्रज्ञ भारतीय तुरुंगात खितपत पडला असताना तुम्ही काय करताय'

agency | Update - Jun 01, 2011, 10:01 PM IST

पाकिस्तान देशाच्या सुप्रीम कोर्टाने पाकिस्तान सरकारला चांगलेच फटकारले असून भारतात आपल्या देशातील एक शास्त्रज्ञ गेल्या वीस वर्षापासून खितपत पडला असून त्याच्या सुटकेसाठी तुम्ही काय केले असा प्रश्न करत सरकारला चांगलेच फटकारले.

  • pak scientist in indian jail, pak court, international, pakistan

    pak_258पाकिस्तान देशाच्या सुप्रीम कोर्टाने पाकिस्तान सरकारला चांगलेच फटकारले असून भारतात आपल्या देशातील एक शास्त्रज्ञ गेल्या वीस वर्षापासून खितपत पडला असून त्याच्या सुटकेसाठी तुम्ही काय केले असा प्रश्न करत सरकारला चांगलेच फटकारले.
    खलील चिश्ती असे भारतीय तुरुगांत असलेल्या ७८ वर्षीय शास्त्रज्ञाचे नाव असून तो गेली २० वर्ष अजमेर येथील तुरुगांत आहे. त्याच्यावर भारतीय व्यक्तीचा खून केल्याचा आरोप आहे. त्याला गेल्यावर्षीच जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे. यासंदर्भात चिश्ती यांची मुलगी शोआ जावेद यांनी प्रसिध्द वकिल सय्यद इकबाल हैदर यांच्यामार्फत सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना कोर्टाने पाक सरकारला फटकारले आहे.कोण आहे चिश्तीचिश्ती याचे वय ७८ असून, त्याने स्कॉटलॅंडमधील एडिनबर्ग विद्यापीठातून पी.एचडी केली आहे. लंडनमधून जीवशास्त्राची पदवीही मिळवली आहे. त्यांनी कराची, संयुक्त अरब अमिराती, नायजेरिया तसेच इराण येथे प्राध्यापक म्हणून काम केले आहे.Trending