आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pak Soliders Ready To Fight Against India, Terrorist

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरेकी, भारताविरुद्धच्या मोहिमेसाठी लष्‍कर सज्ज , पाक हवाई दल प्रमुखांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - हवाई दल अतिरेकी व भारताविरुद्धच्या मोहिमेसाठी तयार असल्याचे पाकिस्तानचे हवाई दलप्रमुख ताहिर रफिक बट यांनी म्हटले आहे. भारतीय सीमेवरील संभाव्य धोका व अतिरेक्यांविरुद्ध लष्कर सज्ज असल्याचे बट यांनी गुरुवारी सांगितले.

जेन्स डिफेन्स वीकलीला दिलेल्या मुलाखतीत बट म्हणाले, दहशतवादविरोधी मोहिमेत हवाई दलाने स्थल सेनेला मदत करण्याचे तंत्र अवगत केले आहे. पाकिस्तान या उन्हाळ्यात जेएफ 17 थंडर जेट्समध्ये हवेत इंधन भरण्याची क्षमता साध्य करेल. याचा जमिनीवरील प्रयोग यशस्वी झाला आहे. आयएल 78 तेल टॅँकरमधून हवेत इंधन भरल्यानंतर जेएफ 17 दीर्घकाळापर्यंत आकाशात राहू शकते. बट म्हणाले, जेएफ 17 विमान पाकिस्तान व चीनची संयुक्त निर्मिती आहे. आयएल 78 युक्रेनकडून 2010 मध्ये मिळाले होते. पाकिस्तानी हवाई दलामध्ये जवळपास 250 जेएफ 17 लढाऊ जेट विमाने आहेत. अमेरिकेने तयार केलेल्या एफ 16 लढाऊ विमानांचाही त्यांच्याकडे ताफा आहे. या विमान उड्डाणासाठी जवानांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकी संसदेच्या मंजुरीनंतर पाकिस्तानला आणखी एफ 16 विमाने मिळाली.