आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Supreme Court Cancelled Bail Of Terrorist Zaki Ur Raheman Lakhvi

मास्टरमाइंड झकी उर रहेमान लख्वी तुरुंगातच राहाणार, सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- मुंबईतील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार झकी-उर-रेहमान लख्वीला सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. पाकिस्तानमधील सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने लख्वीला दिलेला जामीनाचा निर्णय रद्द ठरवत त्याचा जामीन फेटाळला आहे. पाकिस्तानच्या एका कोर्टाने लख्वीला जामिनावर मोकाट सोडले होते.

यापूर्वी लख्वीला नजरकैदेत ठेवण्याचा सरकारचा निर्णय इस्लामाबाद हायकोर्टाने रद्दबादल ठरवला होता. त्यानंतर लख्वीच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला असतानाच पोलिसांनी लखवीला सहा वर्षांपूर्वीच्या अपहरणाच्या एका प्रकरणात पुन्हा अटक केल्यामुळे त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला होता. हायकोर्टाने पाक सरकारचा निर्णय रद्द केल्याची भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटली होती.

इस्लामाबाद हायकोर्टाच्या आदेशानुसार लख्वीची सुटका होण्याच्या काही वेळ आधी मोहम्मद अन्वर नावाच्या व्यक्तीचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली त्याला पुन्हा अटक करण्यात आली. सहा वर्षांपूर्वी लख्वीने आपले अपहरण केले होते, असा आरोप अन्वरने केला होती. अपहरणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर लख्वीला रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगातून बाहेर काढून कडक सुरक्षा व्यवस्थेत न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने लख्वीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी त्याला अज्ञातस्थळी नेले. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही लख्वीला गोलरा शरीफ पोलिस ठाण्यात ठेवू शकत नाही, असे गृह मंत्रालयाच्या एका अधिकार्‍याने सांगितले होते.