आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan 2010 Sufi Shrine Bombing Mastermind Sentenced To Death

सुफी दर्गा हल्ला प्रकरण : मास्टर माइंडला 52 वेळा फाशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाहोर - पाकिस्तानातील सुफी दर्गा हल्ला प्रकरणात न्यायालयाने गुरुवारी मास्टर माइंडला 52 वेळा फाशीची शिक्षा ठोठावली आहे. दुसर्‍या किशोरवयीन दोषीला 52 वेळा जन्मठेप झाली आहे. चार जणांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली.विशेष म्हणजे या हल्ल्यात 52 पाकिस्तानी नागरिक ठार झाले होते. त्यामुळे न्यायालयाने प्रत्येक नागरिकाच्या हत्येबद्दल शिक्षेचे प्रतीक म्हणून म्हणून एकाला 52 वेळा फाशी, तर दुसर्‍या हल्लेखोराला 52 वेळा जन्मठेप सुनावली आहे.

पंजाबच्या हजरत सखी सरवर सुफी दर्ग्यामध्ये 3 एप्रिल 2010 मध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 52 जण ठार, तर 152 जण जखमी झाले होते. प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयाने बहराम खान ऊर्फ सुफी बाबा यास हल्ल्याचा मास्टर माइंड असल्याचे म्हटले आहे. त्यास मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. उमर फिदाई नावाच्या किशोरवयीन दोषीला 52 वेळा जन्मठेप झाली आहे. हल्ला झाला तेव्हा तो केवळ 14 वर्षांचा होता. दर्ग्यामध्ये बॉम्ब ठेवण्यासाठी त्याला तयार करण्यात आले होते. स्फोट त्याच्या साथीदाराने केला होता. त्यात दोषीही जखमी झाला होता. खटल्याची सुनावणी 22 महिने चालली. न्यायाधीश आसिफ मजीद यांना हा फैसला दिला. बुधवारी शिक्षा सेंट्रल जेलमध्ये सुनावण्यात आली. फिदाई आणि खान हे दोघेही याच तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.

आयएसआय प्रमुख अडचणीत - आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जाहिर-उल-इस्लाम यांच्या विरुद्ध चार कर्मचार्‍यांनी इस्लामाबाद उच्च् न्यायालयात धाव घेतली आहे. सात वर्षांपासून कनिष्ठ विश्लेषक पदावर कार्यरत असल्याचा त्यांचा दावा आहे. पाच वर्षांसाठी त्यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर सेवेत कायमचे सामावून घेतले जाणार होते. या प्रकरणी न्यायालयाने 31 डिसेंबरला त्यांना कायम करण्याचे आदेश दिले होते. परंतु त्याचे पालन झाले नाही.