आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानी वकिलाची सुरक्षा देण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- 2008 चा मुंबई हल्ला आणि बेनझीर भुत्तो हत्या खटल्याचे काम पाहणार्‍या सरकारी वकिलास जिवे मारण्याची धमकी आली आहे. त्यामुळे आपल्याला सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी वकिलाकडून करण्यात आली आहे. फेडरल एजन्सीकडून काम पाहणारे विशेष सरकारी वकील मोहंमद अझहर चौधरी यांनी सुरक्षेच्या मुद्द्यावर कोर्टाचे लक्ष वेधले. चौधरी यांच्याकडे दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो हत्या व मुंबईतील दहशतवादी खटल्याचे प्रकरण आहे.