आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Again Keep Mum On Over The Remark Of Fourth War With India

भारतासोबत चौथे युध्‍द करण्‍याची धमकी देणा-या पाकिस्तानला पुन्हा शहाणपणाची जाणीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - काश्मीर समस्या सोडवण्यासाठी भारतासोबत चौथे युद्ध होऊ शकते, अशी भाषा करणार्‍या पाकिस्तानने गुरुवारी पुन्हा एकदा शांती चर्चेचा सूर आळवत शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या दुसर्‍या दिवशी हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते एजाज चौधरी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत देशाची भूमिका स्पष्ट करून सारवासारव केली. काश्मीरच्या मुद्दय़ावर आम्ही भारताला नेहमीच चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यावर तोडगा काढण्यासाठी काश्मिरी नेत्यांचा सहभागदेखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे आम्हाला वाटते. केवळ चौथे युद्ध झाल्यानंतर काश्मीरची समस्या सुटू शकेल, असे वक्तव्य शरीफ यांनी केल्याचा दावा पाकिस्तानातील आघाडीच्या वृत्तपत्राने करून खळबळ उडवून दिली होती. त्यावर पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यास चोख उत्तर दिले होते . काश्मीर मुद्दय़ावरील आमची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे. पाकिस्तानने काश्मिरी जनतेला नेहमीच राजनैतिक पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर शरीफ यांनी वारंवार भारत-पाकिस्तान यांच्यात चांगल्या शेजार्‍यांप्रमाणे संबंध असावेत, असे म्हटले आहे.
प्रस्तावित भिंत प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ (एलओसी) सुरक्षा भिंत उभारण्याचा प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. त्यावर पाकिस्तानकडून स्पष्टीकरण देण्यात आले. नियंत्रण रेषेच्या 500 मीटर भागात कसलेही बांधकाम केले जाणार नाही, असे उभय देशांतील समझोत्यामध्ये ठरलेले आहे.
दृढ संबंधांची इच्छा : अनेक दशकांपासून पाकिस्तानची काश्मीरबद्दलची भूमिका सर्वांना माहीत आहे. विद्यमान सरकारही भारतासोबतचे संबंध दृढ ठेवण्याविषयी आग्रही आहे. पंतप्रधानांनीही तसे संकेत दिले आहेत. सियाचीनच्या मुद्दय़ावर चौधरी म्हणाले, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी याबाबत केलेले वक्तव्य पर्यावरणसंदर्भाने होते. त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ नये. जगातील सर्वात उंच युद्धभूमीवरील भारतीय सैन्य मागे घेण्यात यावे, असे अजीज म्हणाले होते.