आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan And India Controversy On Baglihar Dam Of Jammu And Kashmir

पाकिस्‍तानला नको होता प्रकल्‍प, भारताने मात्र पूर्ण केले धरणाचे काम, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू- काश्मीर मधील जनतेला वेठीस धरून दहशतवादी भारतीय लोकशाहीवर हल्ला करण्याचा प्रयत्न वारंवार करत असतात. पाक व्‍याप्‍त काश्‍मीर असो किंवा जम्मू-काश्मिर दहशतवाद्यांनी सर्वसामान्‍य नागरिकांना नेहमीच हानी पोहोचवतात. या दहशतवाद्याना थार देणा-या पाकिस्‍तानने मात्र जम्मू- काश्मीरच्‍या विकासाला नेहमीच विरोध केला. आजही काश्‍मीर खो-यात दहशतवाद्यांचे भ्‍याड हल्ले होत आहेत. सध्‍या होत असलेल्‍या विधानसभा निवडणूकीच्‍या नि‍मित्ताने जम्मू-काश्मिरच्‍या विकासाला पाकिस्‍तान कशा प‍द्धतीने विरोध करत आहे. याविषयी तुम्‍हाला माहिती देणार आहोत.
दहशतवादी आणि स्‍वतंत्र काश्मीरची मागनी करणारे फुटीरतावाद्यांनी या प्रांताच्‍या विकासात नेहमीच आडथळा निर्माण केला. यामुळे विकासाच्‍या अनेक योजना पूर्ण होऊ शकल्‍या नाहीत. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच एका योजनेची माहिती देणार आहोत. ही योजना पूर्ण होणार नाही यासाठी पाकिस्‍तानही प्रयत्‍न करत होता. मात्र भारताने 'बगलीहार पनबिजली परियोजना' हा प्रकल्‍प पूर्ण केला.
काय आहे 'बगलीहार पनबिजली परियोजना' प्रकल्‍प-
जम्मू- काश्‍मीरमधील डोडा जिल्‍ह्यातील चेनाब नदीवर प्रकल्‍प उभा करण्‍यात यावा यासाठी 1992 मध्‍ये प्रस्‍ताव पाठवण्‍यात आला. 1996 मध्‍ये 'बगलीहार पनबिजली परियोजना' नावाच्‍या प्रकल्‍पाला सरकारने मान्‍यता दिली. या प्रकल्‍पाचे काम 2004 मध्‍ये सुरू करण्‍यात आले. मात्र पाकिस्‍तानने विरोध केल्‍यामुळे हा प्रकल्‍प पूर्ण करण्‍यास विलंब लागला.
पाकिस्‍तानचा विरोध-
या प्रकल्‍पाची निर्मिती करून भारत जुन्‍या सिंधू-संधिचे उल्‍लंघन करत असल्‍याचा आरोप पाकिस्‍तान करत होता. या तलावामुळे पाकिस्‍तानच्या वाट्याचे पाणी पाकिस्‍तानला मिळणार नाही अश्‍या प्रकारचा आरोप पाकिस्‍तानने भारतावर केला. वर्ल्‍ड बँकेने मध्‍यस्‍ती करून पाकिस्‍तानचा दावा फेटाळून लावला.
900 MW विद्युत निर्मिती केली जाणार-
यानदीवर तयार करण्‍यात आलेला प्रकल्‍पातून 900 MW वजनिर्मिती करण्‍यात येणार आहे. चेनाब नदीवर तयार करण्‍यात आलेल्‍या प्रकल्‍पाची लांबी 317 मीटर, तर उंची 144.4 मिटर आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा या प्रकल्‍पाची फोटो...