आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Army & Administration Problem Gilani Zardari Meetings

पाकिस्तानात बैठकांचा सिलसिला सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये बैठकांचा सिलसिला सुरू आहे. पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी सोमवारी दिवसभर अनेक वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. दुसरीकडे सायंकाळी उशिरा ते राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लष्कर व सरकार यांच्यातील तणाव वाढला असतानाच सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांना भ्रष्टाचार प्रकरणात अवमान नोटीस पाठवली आहे. त्याचबरोबर 19 जानेवारी रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही दिले आहेत. लष्कराच्या वर्चस्वाचा बीमोड करण्यासाठी व लोकनियुक्त सरकार सर्वोच्च राहावे, यासाठी आवश्यक असणारा ठराव मांडण्याचा गिलानी यांचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावासंबंधी चर्चा करण्यासाठी गिलानी यांनी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी स्तरावर मन वळवण्याच्या मोहिमेला वेग आणला आहे. त्या पार्श्वभूमीवर ते झरदारी यांची भेट घेणार आहेत. त्याचबरोबर देशातील चालू घडामोडींवरही उभय नेत्यांमध्ये चर्चा होणे अपेक्षित आहे. झरदारी यांच्या विरोधातील खटल्यांचा मुद्दाही बैठकीत चर्चिला जाऊ शकतो.
देशातील विविध मुद्द्यांवर पाकिस्तान पीपल्स पार्टीची बैठक बोलावण्यात आली असून ही बैठक गिलानींच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ही बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी होईल. सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या नोटिशीवर काय भूमिका घ्यायची, यावरही विचारविनिमय होऊन रणनीती ठरवली जाणार आहे. देशाच्या संसदेत मांडण्यात येणाºया ठरावावर होणाºया मतदानाविषयीही चर्चा होणार आहे. दुसरीकडे अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या खात्म्यानंतर देशात लष्करी शासन येण्याच्या भीतीने राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेची मदत मागितली. त्यातून मेमोगेटचे प्रकरण उजेडात आले आहे. मेमोगेट प्रकरणाचा तपास करण्याची लष्कराची विनंती सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली असून याप्रकरणी एका न्यायालयीन आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. हा आयोग या प्रकरणाचा तपास करील.